Cooperative Sugar Mills: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (एनएफसीएसएफ) राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना आज पुरस्कार जाहीर केले आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, सोमेश्वर, नीरा भीमा आणि विघ्नहर या चार सहकारी कारखान्यांनी या पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. .तज्ज्ञ समितीने प्रस्तावांचे मूल्यमापन केले. त्यामध्ये केंद्र सरकारचे मुख्य संचालक (साखर), कानपूरचे शर्करा संस्थान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, एनएफसीएसएफचे कार्यकारी संचालक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक यांच्या समितीने प्रस्तावांचे मूल्यमापन केले.देशातील २६० सहकारी कारखान्यांपैकी सन २०२४-२५मध्ये ८८, तर २०२५-२६ साठी १०२ कारखान्यांनी प्रस्ताव दिले होते. महाराष्ट्रातील कारखान्यांनी २१ पारितोषिके पटकावली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे..Siddheshwar Sugar Factory: ‘सिद्धेश्वर’ला थकहमी;मात्र कर्ज मंजुरीची प्रतीक्षा.यामध्ये २०२४-२५ गाळप हंगामासाठी ‘राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा सर्वोच्च पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे. याच हंगामासाठी पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास देशाच्या उच्च उतारा विभागातून तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त झाला आहे. .तर, २०२५-२६ या हंगामासाठी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यास उच्च उतारा विभागातून प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला आहे. याच विभागातून तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे..Sugar Factory Loan: राज्यातील दोन साखर कारखान्यांना दिलासा; ३३५ कोटींचे कर्ज मंजूर.नवी दिल्ली येथे २२ सप्टेंबरला सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती एनएफसीएसएफचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली..जिल्हा बँकेलाही पुरस्कारसन २०२५-२६ या हंगामातील ‘उत्कृष्ट सहकारी बँक’ हा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे. जिल्हा बँकेने साखर कारखान्यांना आर्थिक आधार देऊन उल्लेखनीय कार्य केल्याने हा पुरस्कार मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.