Jammu Rain Update : जम्मूमध्ये मुसळधार पाऊस; सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rains in Jammu: चिनाबसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
Jammu Rain
Jammu RainAgrowon

Jammu Kashmir Monsoon Update : जम्मू (वृत्तसंस्था) ः जम्मूमध्ये बुधवारी (ता. १९) मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. येथील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील सात दिवस येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जम्मूमध्ये १९८० नंतर पहिल्यांदाच एवढ्याप्रमाणात पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली.

जम्मूमध्ये आणि विशेषतः येथील कठुआ आणि सांबा जिल्ह्यात मंगळवारी (ता. १८) मध्यरात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्गावरील काही भागासह इतर अनेक ठिकाणी भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने अनेक जण अडकून पडले आहेत. चिनाब आणि तिच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे येथील अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः कठुआ येथील उझ नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन, नदीचे पाणी पूर रेषेपर्यंत येऊन पोहोचले आहे. तरणा नाल्याला आलेल्या पुलामुळे येथील चडवाल पुलाचे देखील नुकसान झाले आहे.

Jammu Rain
Himachal Rain : हिमाचल प्रदेशात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ज्या कटरा येथे तळ उभारण्यात आला आहे, त्या कटरे येथे ३१५.४ मिमी. पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

त्यामुळे वैष्णो देवीला जाणाऱ्या भाविकांसाठी सुरू करण्यात आलेली हेलिकॉप्टर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. जम्मू-काश्‍मीरमधील दोडा आणि किश्‍तेवाड येथील सरकारी आणि खासगी शाळांना बुधवारी सुटी देण्यात आली.

कठुआत चौघांचा मृत्यू
कठुआ येथे बुधवारी (ता. १९) झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खन होऊन अनेक घरांचे नुकसान झाले आहे. बाणी आणि सुरजन या गावांत घरे कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे तर तीनजण ढिगाऱ्या खाली अडकले असण्याची शक्यता आहे. येथे पोलिसांच्या वतीने बचाव कार्य सुरू आहे.


Jammu Rain
Weather Update : मुसळधार पावसाचा इशारा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com