Konkan Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी हजेरी लावत आहेत. राज्याच्या अनेक भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. आज (ता. २८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक गोरखपूर, दरभंगा, बालूरघाट ते मणिपूरपर्यंत सक्रिय आहे.
पश्चिम आसाम परिसरावर, तसेच तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंतर्गत कर्नाटक पासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
ढगाळ हवामानासह उकाडा कायम
राज्यात ढगाळ हवामानासह, उकाडा कायम आहे. तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडत आहेत. पावसाची उघडीप असलेल्या भागांत उन्हाचा ताप वाढला आहे.
आज (ता. २८) कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.