Pune News: दौंड तालुक्यात कृषी विभागाच्या विविध योजनांअंतर्गत महाडीबीटी प्रणालीवरील अनुदान वितरणात मोठा विलंब होत असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असून यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे..यंदा २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तालुक्यात एकूण ९,१०४ अर्ज प्रक्रियेत आहेत. त्यापैकी ६,०५३ अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड केली असून २,७६५ लाभार्थ्यांनी इनव्हॉइस सादर केले आहेत..Subsidy Delay: दोन हजार कोटींचे अनुदान रखडविले.तसेच २,४४५ प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, इतक्या टप्प्यांनंतरही केवळ ७८६ लाभार्थ्यांनाच अनुदान वितरित झाले आहे. दरम्यान, सुमारे १,७०० प्रकरणांमध्ये तब्बल १५.५४ कोटी रुपयांचा निधी प्रलंबित आहे..आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्याच्या पार्श्वभूमीवर हा विलंब अधिकच चिंताजनक ठरत आहे. अनेक शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत साहित्य खरेदी करूनही अनुदान न मिळाल्याने त्यांना कर्जाचा ताण सहन करावा लागत आहे..Farmer Subsidy Delay: मंजुरीतील विलंबामुळे अनुदानात अडचणी.या पार्श्वभूमीवर महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित प्रकरणांना गती देऊन अनुदान वितरण तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. राज्याच्या कृषिमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे..मी महाडीबीटी योजनेअंतर्गत अर्ज करून पाच ते सहा महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहे. सर्व कागदपत्रे आणि इनव्हॉईस अपलोड करूनही अजून अनुदान मिळालेले नाही. सध्या पीक कर्जाचा भरणा करायचा आहे. अनुदान लवकर मिळाले तर आर्थिक अडचण कमी होईल.हनुमंत दिवेकर, प्रगतिशील शेतकरी, दौंड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.