Rain Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update : उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज

Team Agrowon

Maharashtra Weather News : पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात हलक्या ते जोरदार पावसासाठी पोषक हवामान होत आहे. आज (ता. ३) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दक्षिण पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. पश्‍चिम बंगालच्या बंकुरा लगत असलेल्या या प्रणालीचे केंद्र रांचीपासून १८० किलोमीटर पूर्वेकडे आहे. ही प्रणाली झारखंड कडे सरकत असून, त्याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाब पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याकडे गेले आहे. मॉन्सूनचा आस गोरखपूर, गया, बंकुरा, कमी दाबाचे केंद्र ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. ३) कोकण, घाटमाथा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. रायगड, रत्नागिरीसह पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT