Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Monsoon 2023 : पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; खानदेशसह मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोर वाढणार

Maharashtra Rain Update : राज्यातील कोकण, मराठवडा, खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

Team Agrowon

Maharashtra Monsoon News : छत्तीसगड आणि परिसरात कमी दाब क्षेत्र आहे. यामुळे अनेक भागांसह राज्यातही काही ठिकाणी पाऊस पडत आहे. हे कमी दाब क्षेत्र मध्य प्रदेश आणि शेजारच्या भागात सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने आज पूर्व विदर्भासह राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.

छत्तीसगड आणि परिसरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती आहे. हे कमी दाब क्षेत्र मागील ६ तासांमध्ये पश्चिम वायव्येकडे १७ किलोमीटर प्रतितास वेगाने वाटचाल करत आहे. हे दाब क्षेत्र छत्तीसगडमधील अंबिकापूरपासून ४० किलोमीटर आणि मध्य प्रदेशातील सिधीपासून १६० किलोमीटर अंतरावर आहे. ही स्थिती पश्चिम वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र ईशान्य मध्य प्रदेश आणि शेजारच्या उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात सरकण्याचा अंदाज आहे. या भागात आल्यानंतर या कमी दाब क्षेत्राचे रुपांतर पुढील १२ तासांमध्ये ठळक दाब क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे.

माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबमधील अमृतसर, कर्नाल, मीरुत, हमीरपूर भागात आहे. कमी दाब क्षेत्राचा केंद्र उत्तर छत्तीसगड आणि शेजारच्या बालासोर आणि बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात आहे. यामुळे देशातील इतर भागासह राज्यातही काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढत आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज दिला. मध्य प्रदेशातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्याच्या काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यांमधील काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

यासोबतच राज्यातील कोकण, मराठवडा, खानदेश आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच संपूर्ण खानदेश, कोल्हापूर, नाशिक आणि मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Urban Issues: शहरातील नागरी समस्यांकडे मनपाने गंभीरपणे द्यावे लक्ष

Kharif Rain: पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज

Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

Agrowon Podcast: पपई दर टिकून; आले चढ-उतारात, काकडीला उठाव, उडीद व कापूस दर दबावात

SCROLL FOR NEXT