Ratnagiri News: लांबणीवर पडलेल्या पावसामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून (अधिक मजबूत) होत आहे. याच कालावधीत थंडीही वाढली असल्यामुळे काही भागांमध्ये हापूस कलमांना मोहोर येऊ लागला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहेत. पुढील काही दिवसांमध्ये वातावरण कसे राहील, याकडेही बागायदार लक्ष ठेवून आहेत. तुडतुडा आणि थ्रीप्सचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बागांमध्ये सध्या कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यावर जोर देण्यात येत आहे. सध्याच्या वातावरणामुळे मोहोर येण्यास पूरक वातावरण तयार झाले आहे..कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असलेला आंबा हंगाम गतवर्षी सुरुवातीपासून प्रतिकूल हवामान आणि निसर्ग संकटाच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेला होता. लांबणीवर पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी आवश्यक थंडी गतवर्षी उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे आंबा हंगामालाही विलंब झाला होता. .Mango Flowering: रायगडमध्ये थंडीमुळे हापूसचा मोहर बहरला.आंब्याला मोहोर येण्यापूर्वी पालवीला अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यातच, थ्रीप्स आणि किडीच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे मोहोरापूर्वी आलेली पालवी धोक्यात आली होती. या साऱ्या प्रतिकूल स्थितीमध्ये बहुतांश कलमांना उशिरा मोहोर आल्याने त्याचा फटका आर्थिक उलाढालींना बसला होता..दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाऊस हंगाम लांबणीवर पडलेला होता. त्यातून, आंबा कलमांना चांगलीच पालवी फुटली होती. मागील महिन्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसाचा म्हणावा तितकासा पालवीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भविष्यात मोहोर येण्यास अनुकूल ठरणारी पालवी दिवसागणिक जून होत आहे. गेल्या आठवडाभरापासून थंडीचाही ज्वर हळूहळू वाढू लागला असून भविष्यामध्ये मोहोर येण्यास ही थंडी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावला आहे..Mango Flowering: आंबा मोहर बाहेर पडण्यासाठी वातावरण अनुकूल .एप्रिलमध्ये मुबलक आंबाबदलत्या वातावरणाचा फटका बसून अनेकवेळा आंबा कलमांना उशिरा मोहोर येतो. पण, आता झाडांनी मोहोर धरल्यामुळे एप्रिलमध्ये मुबलक प्रमाणात आंबा उपलब्ध होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे..तापमान दहा अंशांपेक्षा कमी राहिल्याचा परिणाम हापूसवर काही प्रमाणात होणार आहे. त्या परिसरातील बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया थांबेल आणि हंगाम लांबेल. त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर आणखी दोनवेळा फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वांझ मोहोर येईल. यासाठी आंबा बागांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.- सलील दामले, आंबा बागायतदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.