Chia Lagwad: राज्यात मागील काही वर्षापासून चिया पिकाला शेतकरी पसंती देत आहे. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाला बाजारभावही चांगला मिळतो. विविध पोषणमूल्ययुक्त असलेल्या चिया मुळात एक औषधी वनस्पती आहे. परंतु चिया पिकाची लागवड करताना योग्य पद्धतीनेही होणे तितकेच महत्त्वाचे असते. अन्यथा चिया पिकाच्या उत्पादनात घट होते..हवामान आणि मातीचिया लागवडीसाठी १० ते ४५°C तापमान आणि १२००-२००० मिमी वार्षिक पाऊस आवश्यक असतो. पेरणीसाठी २५ ते ४०°C तर कापणीसाठी २५-४०°C तापमान उपयुक्त असते. चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय किंवा वालुकामृत्तिका माती उपयुक्त असते. चिया आम्लीय जमिनीत चांगली वाढू शकते परंतु क्षारयुक्त व पाणथळ माती त्याला मानवत नाही..Chia Seed Farming: चिया सीड दहा हजार हेक्टरचा टप्पा गाठणार.लागवडीसाठी पूर्वतयारीचिया लागवडीसाठी शेताची खोल नांगरट करून जमीन सैल करावी. पारंपरिक पद्धतीत बियाणे पसरवून लावले जातात, तर व्यावसायिक शेतीमध्ये २.५ ते ३ किलो बियाणे प्रति एकर या प्रमाणात ०.७ ते ०.८ मीटर ओळींमध्ये पेरणी केली जाते.बियाण्यांचे प्रकारकाळी चिया बियापांढरी चिया बिया.पेरणीया पिकाच्या पेरणीची योग्य वेळ ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आहे. एकरी सुमारे १ किलो बियाणे लागते. लागवडीचे अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. हलक्या जमिनीत चिया पिकाची पेरणी ४५ बाय २० सें.मी. अंतरावर करावी. मध्यम ते भारी जमिनीत ६० बाय १५ सें.मी. अंतर ठेवावे, तर काळ्या जमिनीत ९० बाय १० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. पेरणी बैलचलित टिफण किंवा ट्रॅक्टरचलित बीज पेरणी यंत्राद्वारे करावी. पेरणीची खोली ३ ते ४ सें.मी. पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर त्वरित हलके सिंचन द्यावे. ७ ते १० दिवसांत अंकुर फुटतात. रोपे ७ ते १० सें.मी. उंच झाल्यानंतर विरळणी करावी..सिंचन आणि व्यवस्थापनप्रभावी सिंचन व्यवस्थापनासाठी किमान चार वेळा सिंचन करावे.पहिले सिंचन: रोपांची पूर्ण उगवण झाल्यानंतर ७ दिवसांनीदुसरे सिंचन: पेरणीनंतर ४० दिवसांनीतिसरे सिंचन: फुलोरा पूर्ण झाल्यानंतर त्वरितचौथे सिंचन: तिसऱ्या सिंचनानंतर १५ दिवसांनी.Chia Seed Farming: हरभऱ्याला पर्याय चिया सीड्स !.कोळपणीच्या वेळी शेतात सऱ्या-वरंबे पद्धत तयार करावी, जेणेकरून सिंचन कार्यक्षम व समप्रमाणात होईल. फुलोऱ्यानंतर चिया पिकास स्प्रिंकलर म्हणजे तुषार पद्धतीने सिंचन करू नये, कारण त्यामुळे उत्पादनात पूर्णतः नुकसान होऊ शकते.हवामानानुसार सिंचनाची गरज बदलते. पीक परिपक्व होण्याच्या काळात ओलावा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे..रोग व कीड नियंत्रणचिया नैसर्गिकरित्या किडरोगासाठी प्रतिरोधक आहे, पण मुळकूज, खोडकूज आणि काकडी मोज़ेक विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जैविक कीटकनाशकांमध्ये नीम तेलाचा वापर प्रभावी ठरतो. पीक परिपक्व होण्याच्या वेळेस मुंग्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे..गारपिट व थंडीपासून संरक्षणथंडीमुळे चिया पिकाची कोवळी पाने आणि फुलोरे काळे पडू शकतात. यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. थंडीच्या काळात हलक्या पाण्याच्या पाटाचे नियोजन करणे फायदेशीर ठरते..कापणी आणि उत्पादनचिया पिकाची काढणी जमिनीच्या मगदुरानुसार ९५ ते १४० दिवसांत परिपक्व होते. उत्पादन अंदाजे ४-५ क्वीटल प्रति एकर मिळते. कापणी हिवाळ्यात होते आणि ती हाताने किंवा यांत्रिक साधनांनी करता येते. भारतीय शेतकरी प्रामुख्याने हँड थ्रेशिंग पद्धतीचा वापर करतात.साठवण व टिकवणचांगल्या प्रकारे स्वच्छ करून वाळवलेल्या चिया बिया ३-४ महिने गोदामात साठवता येतात, तर कोरड्या हवामानात त्या २-३ वर्षांपर्यंत टिकतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.