Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; विदर्भात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Weather Update : हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर आता कमी झाला. काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. तर क्वचित ठिकाणी जोरदार सरी होत आहेत. हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज कोल्हापूर, सातरा, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाडा आणि खानेदशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला. 

उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवाड्यात आणि इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही देण्यात आला.

सोमवार, मंगळवार आणि बुधवारीही विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तेस पुणे आणि सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला, राज्याच्या इतर भागातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT