Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon 2023: राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा

Monsoon Latest Update : राज्याच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भगात आज जोरदार सरी बरसल्या. तर राज्यातील अनेक भागात हलक्या सरी पडल्या.

Team Agrowon

Maharashtra Monsoon 2023: पुणे: राज्याच्या काही भागात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भगात आज जोरदार सरी बरसल्या. तर राज्यातील अनेक भागात हलक्या सरी पडल्या. हवामान विभागाने आजही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, दिल्ली, लखनऊ, मुज्जफरपुर, बलूघाट परीसरात आहे. तसेच अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या संपूर्ण भागात व्यापलेला आहे. उत्तर पाकिस्तान आणि परीसरात समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमिटर ते 9.5 किलोमिटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या वायव्य दिशेला एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरातही कमी दाब क्षेत्र आहे. हा कमी दाबाचा पट्टा समुद्रसपटीपासून 3.8 किलोमीटर उंचीवर आहे. 

दक्षिण गुजरात आणि मध्या प्रदेशच्या दरम्यान एक वादळाची स्थिती दिसत आहे. किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रापासून ते केरळपर्यंत विस्तारला आहे. बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात 16 जुलैपर्यंत वादळाची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेशातही चक्रीवादळाची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमिटर उंचीवर आहे. 

राज्याच्या अनेक भागांत सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात ठिकठिकाणी जोरदार सरी पडत आहेत. तर बहुतांश ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. अस असल तरी अनेक भागाला अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर मराठवाडा आणि खानदेश ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

मराठवड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ खानदेशातील जळगाव, नंदुरबार तर कोकणातील सिंधुदुर्ग, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT