Monsoon 2023: राज्याच्या या भागात जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update : राज्याच्या काही भागात जोरदार माॅन्सून सरी पडत आहेत. तर काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
Monsoon 2023
Monsoon 2023Agrowon
Published on
Updated on

Weather Update : राज्याच्या काही भागात जोरदार माॅन्सून सरी पडत आहेत. तर काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दुसरीकडे माॅन्सूनने आज प्रगती केली नाही.

माॅन्सूनने राजस्थान, पंजाब आणि हरियाना काही भाग व्यापायचा बाकी आहे. आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला.

देशात माॅन्सूनने मागील चार दिवसांमध्ये चांगली प्रगती केली होती. सोमवार्यंत देशातील बहुतांशी भाग व्यापला होता. पोषक हवामान असल्याने माॅन्सूनचा प्रवास वेगाने सुरु होता. बुधवारी माॅन्सूनने राजस्थानच्या काही भागात प्रगती केली होती.

तसेच उत्तर अरबी समुद्राचा संपूर्ण भाग माॅन्सूनने व्यापला होता. माॅन्सूनची सिमा बिकानेर, नरनौल, फिरोजपूरपर्यंत होती. आजही माॅन्सून याच भागात होता. आज माॅन्सूनने प्रगती केली नाही.

यंदा माॅन्सूनची वाटचाल रखडत झाली तरी काही भागांमध्ये माॅन्सून यंदा वेळेच्या आधीच पोचला. तसेच यंदा पहिल्यांदा माॅन्सून मुंबई आणि दिल्लीमध्ये पोचला. माॅन्सूनच्या प्रगतीसाठी सध्या पोषक हवामान आहे. पुढील दोन दिवसांमध्ये माॅन्सून राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उरलेला भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला.

Monsoon 2023
Monsoon Update : घाटमाथ्यावर पुढचे ५ दिवस अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून मोठी अपडेट

उत्तर मध्य प्रदेश आणि शेजारच्या भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. देशाच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ, किनारी कर्नाटक आणि केरळमध्ये बहुतांशी ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

तर महाराष्ट्रातील कोकणात जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडत आहे. तर मराठवड्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली, अशी माहिती हवामान विभगााने दिली.

हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.

तर पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातही बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com