Konkan Rain Agrowon
हवामान

Konkan Rain : कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Konkan Rain Update : आज (ता. २४) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Team Agrowon

Konkan Monsoon Update : पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून, अंबाला, बरेली, पटना, बालूरघाट ते मिझोरामपर्यंत विस्तारला आहे. उत्तर प्रदेशाच्या वायव्य भागात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

त्यापासून दक्षिण आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण उत्तर प्रदेशात, तसेच दक्षिण गुजरातमध्ये चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. दक्षिण छत्तीसगडपासून तेलंगणा, रायलसीमा आणि तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

ढगाळ हवामान कायम

राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज (ता. २४) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान ढगाळ राहण्याचा, तसेच तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT