Swabhimani Shetkari Sanghatana: परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिके करपून गेली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. .मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी ठोस मदत पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. १६) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळ मोर्चा काढण्यात आला..Rohit Pawar Demands Drought Declaration: शेतीसमोर संकट अधिक गडद? तत्काळ दुष्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, १० मुद्दे केले उपस्थित.राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच परभणी जिल्ह्यातील श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्स, श्री तुळजाभवानी शुगर, जी सेव्हन शुगर्स आणि ट्वेंटीवन शुगर्स युनिट-३ या साखर कारखान्यांनी मागील हंगामातील उसाचा प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावा. वाहतूक ठेकेदारांचे कमिशन व प्रलंबित बिलेही त्वरित अदा करावीत, अशी मागणी करण्यात आली..Drought Relief Package: राज्यात दुष्काळ जाहीर करा; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.मागील वर्षातील काही महसूल मंडलांमधील प्रलंबित पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी. पीकविमा योजनेतून वगळण्यात आलेली जोखीम घटकांची ‘ट्रिगर’ तत्काळ लागू करावीत, अशी मागणीही करण्यात आली..सरकारने पाहणी दौरे आणि पंचनाम्यांचा फार्स न करता परिस्थितीची दखल घेऊन तातडीने मदत पॅकेज जाहीर करावे. अन्यथा संपूर्ण मराठवाड्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, सय्यद कलीम, पी. टी. निर्वळ, मारोती पवार आणि मुंजाभाऊ लोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.