Video
Devendra Fadanvis : मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मुख्यमंत्री काय म्हणाले?
मराठवाड्याचा दुष्काळ मुक्त करू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. निमित्त मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं. मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी बोलताना शेती प्रश्न, कर्जमाफी, वीज बिल, पावसाचे खंड, दुष्काळ आणि मराठवाड्यातील सिंचनाचे प्रकल्पा यांची उजळणी केली. त्यासोबत कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होत असल्याचा दावा केला. आता मुख्यमंत्री मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले? कर्जमाफीच्या उर्वरित याद्यांची काय माहिती त्यांनी दिली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा दुष्काळ संपवण्यासाठी काय ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली? हेच जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून...
