Rain Agrowon
हवामान

Konkan Monsoon Update : दक्षिण कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Latest Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असली, तरी उर्वरित राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Konkan Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू असली, तरी उर्वरित राज्यात पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. राज्यात अनेक भागात ऊन-सावल्यांच्या खेळात अधून-मधून पावसाच्या सरी पडत आहेत.

आज (ता. ३) दक्षिण कोकण, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

वायव्य उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, ग्वालियर, अंबिकापूर, बालासोर, ते बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

आज (ता. ३) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. रायगड, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची, तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असून, उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, पुणे.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ.

कोकण, घाटमाथ्यावर संततधार

मॉन्सून सक्रिय असल्याने कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोटात पावसाची संततधार सुरूच आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. या भागात अनेक ठिकाणी अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. कोकण, घाटमाथा वगळता अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतिक्षा आहे.

कोकण :

पेण १३०, मोखेडा प्रत्येकी १२०, जव्हार, तलासरी प्रत्येकी ११०, विक्रमगड १००, वाडा ९०, भिवंडी, मुरबाड, माथेरान, लांजा, सावंतवाडी प्रत्येकी ८०, चिपळूण, दोडामार्ग, तळा, सुधागड पाली, कणकवली, माणगाव, वाकवली, दोपोली, पोलादपूर प्रत्येकी ७०, सुधागड देवरूख, पनवेल, खेड, कुडाळ प्रत्येकी ६०.

मध्य महाराष्ट्र :

पेठ १००, इगतपूरी ९०, सांगली, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ८०, महाबळेश्वर, गगनबावडा प्रत्येकी ७०, हर्सूल, ओझरखेडा, राधानगरी प्रत्येकी ६०, लोणावळा, शाहूवाडी, पौड प्रत्येकी ४०, मुल्हेर, धाडगाव, कागल, पाटण, अक्कलकुवा, नाशिक, आजरा प्रत्येकी ३०.

घाटमाथा :

वाणगाव प्रत्येकी १००, आंबोणे, दावडी, कोयना नवजा प्रत्येकी ९०, डुंगेरवाडी ८०, शिरगाव, खोपोली प्रत्येकी ७०, लोणवळा, वळवण, ताम्हिणी, भिरा प्रत्येकी ६०.

मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव :

वैतरणा ११०, मध्य वैतरणा १००, अप्पर वैतरणा ९०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द : महसूलमंत्री बावनकुळे

Agricultural Tools Scam: घोटाळेबहाद्दरांचे कारनामे

Forest Land Leasing: वनक्षेत्राजवळील जमीन भाडेपट्ट्याने

Vidarbha Heavy Rain : विदर्भात २५८ मंडलांत अतिवृष्टी; उर्वरित राज्यात जोर कमी

Sewage Treatment Project: सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात हलगर्जी

SCROLL FOR NEXT