Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली!, नव्या संसदेतील पहिलं अधिवेशन कसं असेल?

Parliament Monsoon Session 2023 : संसदेच्या पावसाळाची अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच नवीन संसद भवना दि. २० जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन ११ ऑगस्ट रोजी संपणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
New Parliament Building
New Parliament Buildingagrowon
Published on
Updated on

Monsoon Session 2023 : संसदेच्या माॅन्सून अधिवेशनाची तारीख निश्चित झाली असून नवीन संसद भवनात पहिल्यांदाच अधिवेशन होणार आहे. २० जुलैपासून अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.

या अधिवेशनात समान नागरी कायदा आणि मणिपूरमधील हिंसाचार या दोन मुद्द्यांवर हे अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

New Parliament Building
Parliament : संसदेची कोंडी कुणाच्या पथ्यावर?

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "२०२३चे संसदेचे मान्सून सत्र २० जुलैपासून सुरु होईल आणि ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. २३ दिवस चालणाऱ्या या सत्रात एकूण १७ बैठका होतील. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांना संसदेच्या कायदेविषयक आणि अन्य कामकाजामध्ये सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. "

New Parliament Building
Chemical Fertilizers : मोदी सरकार युरियाच्या किंमती वाढवणार का?

या अधिवेशनात मोदी सरकार समान नागरी कायद्याचे विधेयक आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या भूमिकांमुळे यावरून जोरदार गदारोळ होऊ शकतो. तसेच मणिपूरमधील हिंसाचार, दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद या सत्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

२० जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन नुकत्याच उद्घाटन झालेल्यान नवीन संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या संसद भवनाचं नुकतंच उद्धाटन झाले होते. या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. त्यानंतर या संसद भवनात पहिल्यांदाच अधिवेशन होणार असल्याने हे सत्र लक्ष्यवेधी ठरणार आहे. दिल्लीतील या नव्या संसद भवनात प्रत्येक मंत्र्यासाठी स्वतंत्र कार्यालय आहे. तसेच प्रत्येक पक्षालादेखील वेगळं कार्यालय दिलं जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com