Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कोकण, विदर्भात उष्णतेची लाट; राज्यातील तापमानात वेगाने वाढ

Heat Wave : राज्यात मागील चोवीस तासात मालेगाव येथे उच्चांकी ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ३९.५ अंश तसेच सोलापूर आणि जळगावमध्ये कमाल तापमान ३९.४ सेल्सियस अंशांवर पोहचलं आहे.

Dhananjay Sanap

Weather Update Maharashtra : राज्यातील तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळांची तीव्रता वाढू लागली आहे. राज्यात आज कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पार ३९ च्या अंशावर पोहचला आहे. त्यामुळे उन्हाचा ताप वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

राज्यात मागील चोवीस तासात मालेगाव येथे उच्चांकी ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ३९.५ अंश तसेच सोलापूर आणि जळगावमध्ये कमाल तापमान ३९.४ सेल्सियस अंशांवर पोहचलं आहे. तर परभणी ३९.१ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच संभाजीनगर, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सांगली येथे पारा ३८ अंशांच्या टप्पा ओलांडला आहे. 

राज्यात आज कोकणातील सिंधुदुर्ग, मराठवड्यातील धाराशिव आणि विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि नागपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाळा तापदायक ठरू लागला आहे. 

देशात मागील चोवीस तासात राजकोट येथे उच्चांकी ४२.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात उन्हाचा पारा चढल्याने दुपारी घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तर रात्री उकाडा जाणवू लागला आहे. 

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच पशुधनाची काळजी घेण्याचा सल्ला कृषी हवामान केंद्रांनी दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT