High Temp Agrowon
हवामान

Weather Update : उन्हाचा चटका असह्य; किमान आणि कमाल तापमानात चांगलीच वाढ

Maharashtra Weather : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा आता असह्य होत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढत आहे. राज्यातील बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानाचा पारा आता असह्य होत आहे. सकाळी हवेतील गारवाही अनेक ठिकाणी कामी झाला. तर पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

राज्यातील काही भागात सध्या सकाळी काहीसा गारवा जाणवत असला तरी तापमानात वाढ झाली. सरासरी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.

तर कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशात चक्राकार वाऱ्याच्या स्थिती आहेत. पश्चिम राजस्थानपासून आग्नेय मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची स्थिती कायम आहे. उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत घामटा निघत आहेत.

सोमवारी दुपारपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे, तर राज्यात अनेक ठिकाणी ३५ अंशांच्या वर सरकले आहे. पुढील पाच दिवस उन्हाचा चटका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Genetic Editing Varieties : आयसीएआरने केले २४ पिकांमध्ये जनुकीय संपादन; भाताच्या दोन सुधारित वाण विकसित, लोकसभेत सरकारने दिली माहिती

Agriculture Budget: शेतीसाठी आर्थिक तरतूद वाढवा, संशोधन पदे तातडीने भरा, संसदीय समितीची सरकारला शिफारस

Local Body Elections: ग्रा.पं.वर प्रशासकाचे सावट!

Citrus Symposium 2025: जैन हिल्स येथे रविवारपासून  लिंबूवर्गीय शेतीविषयी मंथन

Water Scarcity: नांदी गावात हिवाळ्यातच पाणीटंचाई

SCROLL FOR NEXT