Weather
WeatherAgrowon

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढला; किमान आणि कमाल तापमानात आणखी वाढीची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात मात्र किमान आणि कमाल तपामानात चांगलीच वाढ झाली. सोलापूर येथे आजही राज्यातील उचांक तापमान होते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले.
Published on

Pune News : देशातील काही भागात पाऊस, हिमवृष्टी आणि ढगाळ वातावणाची स्थिती आहे. पण राज्यात मात्र किमान आणि कमाल तपामानात चांगलीच वाढ झाली. सोलापूर येथे आजही राज्यातील उचांक तापमान होते, असे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

Weather
Summer Heat Update : उन्हाचा चटका अन् घामाच्या धारा


नैर्ऋत्य राजस्थान आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे वातावरणात बदल होत आहेत. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात ढगाळ हवामान होते. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. तर उकाडा वाढल्याने घामटा निघत आहेत.  

Weather
Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ शक्य

सोमवारीही किमान तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली. दुपारपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. उद्याही राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान विभागाने देशातील काही भागात पावसाचाही अंदाज व्यक्त केला. जम्मू, काश्मिर, लडाख, गिरगीट, बोल्टीस्थान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज काही भागात हीमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच या भागात पुढील तीन दिवस पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com