Heat Update  Agrowon
हवामान

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

Weather Update : ५ दिवस देशातील अनेक ठिकामी उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

Anil Jadhao 

Pune News : देशातील बहुतांशी भागात तापमान चांगलेच वाढले आहे. काही भागातील तापमान तर ४४ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. यापुढील ५ दिवस देशातील अनेक ठिकामी उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

देशात ओडिशा आणि तेलंगणात तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याचा अंदाज आहे. कारण काल या ओडिशाच्या काही भागात आणि आंध्र प्रदेश, तेलंगणातील काही ठिकाणी सरासरी तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तर बंगाल आणि विदर्भाच्या काही भागात तर छत्तीसगड, नैऋत्य मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात काही भागात तापमान सरासरी ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.

तसेच अनेक राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान ४० ते ४२ अंशाच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंशाने जास्त होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसिमा भागातील काही ठिकाणी ३ मेपर्यंत सरासरी तापमान ४४ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते.

२ ते ४ मेच्या दरम्यान पश्चिम बंगालचा काही भाग आणि बिहारमध्ये काही ठिकाणी उष्ण ते अति उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णेतेच्या लाटा येऊ शकतात, तर ४ आणि ५ मे रोजी विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटा येऊ शकतात, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT