Heat Wave Agrowon
हवामान

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Weather Update : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात होरपळ कायम आहे. कोकणातही उन्हाचा चटका, उकाडा असह्य होत आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात होरपळ कायम आहे. कोकणातही उन्हाचा चटका, उकाडा असह्य होत आहे. आज (ता. ४) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. राज्यात आकाश अंशतः ढगाळ होत आहे. यातच स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्याचे उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

दरम्यान, उन्हाचा चटका कायम असल्याने सोलापूर, बीड, मालेगाव, अकोला, गडचिरोली येथे ४२ अंश, अनेक ठिकाणी तापमान चाळिशीपार आहे. आज (ता. ४) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूरसह तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३९.७, धुळे ४१.५, जळगाव ४१.४, कोल्हापूर ३९.१, महाबळेश्‍वर ३३, मालेगाव ४२.४, नाशिक ३७.९, निफाड ३७.९, सांगली ४०.८, सातारा ४०.७, सोलापूर ४२.८, सांताक्रूझ ३३, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३३.२,

छत्रपती संभाजीनगर ३८.८, बीड ४२.६, नांदेड ४१.८, परभणी ४१.४, अकोला ४२.३, अमरावती ४१.४, बुलडाणा ३८.६, ब्रह्मपुरी ४१.९, चंद्रपूर ४३, गडचिरोली ४२, गोंदिया ३९, नागपूर ३९.९, वर्धा ४१.५, वाशीम ४१.८, यवतमाळ ३९.७.

उष्ण लाट, उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

चंद्रपूर ४३, सोलापूर ४२.८, बीड ४२.६, मालेगाव ४२.४, अकोला ४२.३, गडचिरोली ४२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT