Hailstorm  Agrowon
हवामान

Avlkali Paus : चार जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

Weather Update : मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली.

अनिल जाधव

Pune News : मागील चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. हवामान विभागाने आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज दिला. तर विदर्भात आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदीया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी आणि गारपीटीचा अंदाज दिला. यावेळ ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.

तर यवतमाळ, वाशीम, वर्धा, गडचिरोली, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज असून यावेळी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

तर आज मराठवड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरींचीही शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उद्या म्हणजेच बुधवारीही विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

विदर्भातील नागपूर, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Subsidy : महाडीबीटीच्या पूर्वसंमतीचा गोंधळ; ॲग्रोवन पोलमध्ये ७५ टक्के शेतकरी पूर्वसंमतीच्या प्रतिक्षेत

Teacher Success Story: कार्यतत्पर शिक्षिका : शोभा माने

Unique ID Code: पारदर्शकतेसाठी दस्तऐवजावर क्यूआरकोड आणि युनिक आयडी

Winter Dairy Management: थंड हवामानाचे दुधाळ जनावरांवर होणारे परिणाम

Tur Production: आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून तुरीचे उत्पादन वाढवा

SCROLL FOR NEXT