डॉ. कैलास दौंडA teacher's Story of Teaching Excellence: शोभा माने या लातूर जिल्ह्यातील खंडापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. इथे त्या नुकत्याच बदलून आलेल्या आहेत. त्या आधी वानवडा या औसा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत साधारणपणे आठ वर्षे कार्यरत होत्या. येथे त्यांनी विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवले. विद्यार्थी विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात..वानवडा येथे लोकसहभागाला चालना देण्यासाठी त्यांनी स्वतः ५० हजार रुपयांचे आर्थिक योगदान दिले. त्यामुळे लोकसहभाग देणारे अनेक हात पुढे आले आणि त्यातून शाळेत काही सुविधा निर्माण करता आल्या. वानवड्यात सात वर्षे पहिली व दुसरी या वर्गांना अध्यापन करून वर्षभरातच त्या साक्षर करत. त्यासाठी वर्गस्तर, शाळास्तर आधारित अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत. त्या बी.ए., बी.एड. असून प्राथमिक वर्गांना अध्यापन करतात..सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर लक्षात घेऊन असर, न्यास अन् पिसा करिता विद्यार्थ्यांच्या स्तरनिहाय व क्षमतानिहाय उपक्रमांचे नियोजन आणि आयोजन केले. त्यासाठी विद्यार्थ्यांचे स्तरनिहाय गट तयार केले. प्रगत गटातील विद्यार्थी प्रगतिशील विद्यार्थ्यांना मदत करू लागले. शाळेतील विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अपुरे शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची अनुपस्थिती, पालकांची अनास्था, वैयक्तिक लक्ष देण्यात अडथळे असे काही अडथळे होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याची निर्मिती, दानशूर पालकांकडून शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून घेतली, लोकसहभागातून वर्ग व शाळाची रंगरंगोटी केली..Teacher Success Story: साहित्यिक शिक्षक : एकनाथ आव्हाड.नावीण्यपूर्ण उपक्रमआनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत बालसभा, क्षेत्रभेट, दिनविशेष, राष्ट्रीय सण, समारंभाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करूत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला. माती व कागदापासून शिल्प बनवणे, दिलेल्या चार शब्दांपासून गोष्ट तयार करणे, नाट्यीकरण करणे, अवांतर वाचन करणे आणि मैदानी खेळ घेणे इत्यादी उपक्रम दर शनिवारी श्रीमती माने घेतात..वानवडा येथील शाळेतील १२५ विद्यार्थ्यांपैकी शोभा माने यांच्याकडे पहिली, दुसरीचे ३७ विद्यार्थी होते त्यापैकी एका गतिमंद विद्यार्थ्यांचा अपवाद सोडता सर्व विद्यार्थी अस्खलित वाचन करत होते. दररोज पाच इंग्रजी शब्दांचे लेखन, वाचन, सोपे इंग्रजी वाक्य वाचन, इंग्रजी कविता व संवाद सादरीकरण सराव त्या घेत असत. वर्गात काही नावीन्यपूर्ण उपक्रम देखील असतात. त्यात भाषिक खेळ, भूमिकाभिनय, संवादाचे सादरीकरण, भाषा व गणित पेटीचा सुयोग्य वापर, आणि ग्रंथालयाचा वापर केला गेल्यामुळे इयत्ता दुसरीतील विद्यार्थी प्रतिमिनिट ७० शब्दापर्यंत गती वाचन करतात..Teacher Story: भावनांचा जाणकार शिक्षक : संतोष जायभाये.लेखन कौशल्यविकासासाठी नावीन्यपूर्ण गृहपाठ, भित्तिपत्रक तयार करणे, स्वतः गोष्ट लिहिणे अशा कृती घेतल्या. त्यातून विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टीचे ‘गुजगोष्टी’नावाचे पुस्तक आकारास आले. प्रश्नपेढी निर्मिती कब, बुलबुल, स्काऊट गाईड अंतर्गत खरी कमाई, गणित जत्राच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार समजावून देणे, थोरांची वेशभूषा या माध्यमातून राष्ट्रभक्तीची रुजवणूक करणे अशा नियमित उपक्रमातून विद्यार्थांची जडणघडण करतात..माने मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्यामुळे शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांकाचे तीन लाखाचे बक्षीस मिळाले. त्यातून शाळेच्या मैदानात परिपाठासाठी शेड उभारण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना काही स्पर्धामध्ये विविध स्तरांवर पारितोषिके प्राप्त झालीत. राज्यस्तरीय हीरक पंख चाचणी शिबिरात शाळेच्या चार विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. जिल्हा मेळाव्यात एकूण १० बक्षिसे देखील प्राप्त झाले आहेत. बालवर्गाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत त्यांनी योगदान दिले आहे..त्यांच्या शालेय उपक्रमात चला लिहिते होऊया, वर्ग १०० टक्के प्रगत करताना, कोविड कॅप्टन आणि बालकांचे शिक्षण, मूलभूत भाषिक क्रियांचा विकास, चार शब्दांपासून गोष्टी बनवू चला अशी असून या उपक्रमांसाठी त्यांना एससीईआरटी कडून पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शोभा माने यांची बदली लातूर तालुक्यातील खंडापूर येथे अलीकडेच झाली आहे..येथील विद्यार्थी संख्या १६९ इतकी असून येथेही त्या सांस्कृतिक विभागाचे व वर्गाअध्यापनाचे काम पाहतात.श्रीमती शोभा माने यांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल लातूर जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा २०२१-२२ चा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार व काही संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व पुरस्कारात मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांचे पाठबळ आहे हे त्या आवर्जून नमूद करतात.शोभा माने ८२०८३३४१४५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.