Hailstorm Agrowon
हवामान

Kokan Garpit: राज्यात उष्णता वाढण्याचा अंदाज; सिंधुदूर्ग जिल्ह्यातील काही भागात गारपीटीचा तडाखा

Maharashtra Weather Alert: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गारपीटीने थैमान घातले असून, केळी, काजू आणि आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, राज्यातील अनेक भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे.

Anil Jadhao 

Pune News: काल सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. यात केळी, काजू आणि आंबा पिकाला फटका बसला. तर राज्यातील बहुतांशी भागात उन्हाचा चटका वाढला आहे. सकाळच्या किमान तापमानातही काहीशी वाढ झाली. राज्यातील उन्हाचा कडाका कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

काल सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना वादळीवारा, गारपीट आणि जोरदार पावसाचा तडाखा बसला. सिंधुदूर्ग जिल्ह्यात काल सकाळपासूनच प्रचंड उकाडा होता. सायंकाळी मात्र दोडामार्ग तालुक्यात पावसाचे वातावरण झाले. काही भागात हलका गडगडाट झाला. त्यानतंर वादळीवारा आणि गारपीटीसह जोरदार पावसाला सुरूवात झाली.

दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी, सासोली, झोळंबे, कोलझर, कळणे, उगाडे, कुडासे, मणेरी, भेडशी, साटेली, परमे, खोक्रल, सोनावल, तेरवण, मेढे, वायंगणतड या गावांना वादळीवाऱ्यांसह पावसाने झोडपून काढले. वादळाच्या तडाख्यात ५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळी मोडून पडल्या. काजू पिकाचे देखील मोठे नुकसान झाले.

या भागात सध्या काजु हंगाम सुरू आहे.वादळीवाऱ्याने काजुचा मोहोर देखील गळुन पडला आहे. इतर भागात ढगाळ वातावरणाचा आंबा काजु पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका कायम आहे. सूर्य तळपायला लागल्याने राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून पुढील तीन दिवस उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट दिला. तर राज्यातील इतर भागातही उन्हाचा चटका कायम राहून तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

ITI Modernization : राज्यातील शंभर ‘आयटीआय’चे बळकटीकरण करणार

Hybrid Calves Crisis : संकरित गाईंची नर वासरे झाली नकोशी

Dam Water Discharge : पावसाचा जोर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील 19 धरणांतून विसर्ग

Humani Attack : विदर्भात हजारो हेक्‍टर पिकांवर हुमणीचा प्रादुर्भाव

Fertilizer Rate : पोटॅशसह इतर खतांच्या दरात झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT