Weather Update Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update: राज्यात पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा चटका; पाच दिवस हवामान कसं राहणार?

देशातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं चढ-उतार सुरू आहे. तर उत्तरेतील काही भागात गारठा वाढण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

मागील चोवीस तासात राज्यात तापमानात चढ-उतार पाहायला मिळत होते. त्यामुळे विविध भागात सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता. राज्यातील काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. कमाल तापमानात काहीशी घट होत आहे.

तर पुढील चार ते पाच दिवस तापमानात मोठे बदल होणार नाहीत. पुढील पाच दिवस मुख्यत कोरड्या हवामानासह निरभ्र आकाश राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. 

आग्नेय अरबी समुद्रावरील समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर ऊंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आता दक्षिण अरबी समुद्रावर पसरली आहे. मागील चोवीस तासात जळगाव येथे राज्यातील निचांकी १६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

देशातील तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसनं चढ-उतार सुरू आहे. तर उत्तरेतील काही भागात गारठा वाढण्याची शक्यता आहे. परंतु राज्यात मात्र कडाक्याच्या थंडीसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

सध्या खरीप हंगामातील काढणी आवरली असून शेतकरी रब्बीच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थंडीच्या आगमनाची आस लागलेली आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत: कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका जाणवण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT