Hail Warning Agrowon
हवामान

Weather Forecast : पूर्व विदर्भ, मराठवाड्यात पाऊस, गारपिटीचा इशारा

Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सरी कोसळत आहे. राज्याच्या तापमानातही घट झाली आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने सरी कोसळत आहे. राज्याच्या तापमानातही घट झाली आहे. आज (ता. १२) पूर्व विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीचा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय राजस्थानमधील चक्राकार वाऱ्यांपासून गुजरात, कोकण, कर्नाटक किनारपट्टी पर्यंत हवेचा कमी दाबाचा सक्रिय आहे. बुधवारी (ता. १०) सायंकाळनंतर बीड, अकोला, बुलडाणा, परभणी या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. गुरूवारी (ता. ११) सकाळी नागपूर येथे पावसाच्या सरी कोसळल्या.

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ आकाश झाले आहे. विदर्भात कमाल तापमानातील घट कायम आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. गुरूवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जेऊर येथे ४१.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

आज (ता. १२) विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट), मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणासह उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे.

गुरूवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३९.५, नगर ३९.८, धुळे ४०.०, जळगाव ३८.०, जेऊर ४१.५, कोल्हापूर ३८.२, महाबळेश्वर ३३.४, मालेगाव ४२.०, नाशिक ३७.८, निफाड ३७.०, सांगली ३८.९, सातारा ३९.१, सोलापूर ४०.०, सांताक्रूझ ३३.०, डहाणू ३४.०, रत्नागिरी ३३.५,

छत्रपती संभाजीनगर ३८.६, बीड ४०.५, धाराशिव ३९.५, परभणी ३८.३, अकोला ३८.३, अमरावती ३५.६, बुलढाणा ३३.८, ब्रह्मपूरी ३८.२, चंद्रपूर ३६.८, गडचिरोली ३५.०, गोंदिया ३५.४, नागपूर ३४.८, वर्धा ३५.८, वाशीम ३०.२, यवतमाळ ३६.५.

वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) :

हिंगोली, नांदेड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा.

४० अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

मालेगाव ४२, जेऊर ४१.५, बीड ४०.५, धुळे ४०, सोलापूर ४०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT