Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : ढगाळ हवामानासह आज हलक्या पावसाची शक्यता

Maharashtra Rain Forecast : मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ७) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

Team Agrowon

Pune News : मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ७) उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान ढगाळसह ऊन-सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण बिहार आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे सरकला आहे.

मॉन्सूनचा आस पंजाबच्या अमृतसरपासून यमुनानगर, बरेली, गोरखपूर, पटना, मालदा ते मणिपूर पर्यंत विस्तारला आहे. पुढील तीन ते चार दिवस मॉन्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहण्याची शक्यता आहे.

ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी

राज्यात मुख्यतः पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. आज (ता. ७) कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

Wheat Harvesting: पुणे विभागात गहू काढणीला वेग

SCROLL FOR NEXT