Monsoon  Agrowon
हवामान

Monsoon Rain : राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील अनेक भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज आहे. 

माॅन्सून ट्रफ आपल्या सरासरी पातळीवर आहे. तर आग्नेय पाकिस्तान आणि चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही कमी दाबाचे क्षेत्र पाकिस्तानकडून बांगलादेशच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे उत्तर भारत आणि मध्य भारतात पावसाची शक्यता आहे. त्यातही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने आज आणि उद्या विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. संपूर्ण कोकणाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आला. मराठवड्यात हलक्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. 

शनिवारी आणि रविवारी संपूर्ण विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली तर खानदेशातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यालाही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT