Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

Rain Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप वाढली आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाचा जोर कमी-अधिक आहे.
Monsoon
Monsoon Agrowon
Published on
Updated on

Pune News : कोकण, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप वाढली आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान असले तरी पावसाचा जोर कमी-अधिक आहे. आज (ता. ३) कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा, तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील पालघर तसेच पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यातील लोणावळा येथे सर्वाधिक १३९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरूवात झाली असली तरी जोरदार पावसाचा प्रतीक्षा कायम आहे.

Monsoon
Monsoon Rain : जुलैमध्ये राज्यात चांगल्या पावसाचे संकेत

मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपुर पासून मणिपूर पर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात ढगाळ हवामान असूनस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान आहे.

Monsoon
Monsoon Rain : काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचे संकेत; कोकण, मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज 

आज (ता. ३) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा, तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (सौजन्य : हवामान विभाग) :

कोकण :

मुंबई शहर : सांताक्रुझ २९.

पालघर : जव्हार ७८, मोखाडा ६३, पालघर ५२, वसई १०५, विक्रमगड ७३, वाडा ६५.

रायगड : माणगाव ५५, माथेरान ७५, पेण ४८, पोलादपूर ४४, सुधागडपाली ४७, तळा ४२.

रत्नागिरी : लांजा ४४, मंडणगड ६३.

सिंधुदुर्ग : दोडामार्ग ४७, मुलदे (कृषी) ४१.

ठाणे : आंबरनाथ ४१, भिवंडी ४६, मुरबाड ६०, शहापूर ४७, ठाणे ५२, उल्हासनगर ४२.

मध्य महाराष्ट्र :

कोल्हापूर : आजरा ४५, चंदगड ५६, पन्हाळा ४७, शाहूवाडी ७८.

नाशिक : हर्सूल ३७, इगतपुरी १२०, ओझरखेडा ४८, त्र्यंबकेश्वर ४१.

पुणे : लोणावळा कृषी १३९, पौड ४९, वेल्हे ६५.

सांगली : कोकरूड ३९.

सातारा : महाबळेश्वर १०१, पाटण ३०.

मराठवाडा :

हिंगोली : औंढा नागनाथ १५,

परभणी : धालेगाव १३.

विदर्भ :

चंद्रपूर : गोंडपिंपरी २८, पोंबुर्णा २३, राजापूर २४.

गडचिरोली : अहेरी २६.

नागपूर : कामठी २१, कुही २३.

वर्धा : देवळी २३.

वाशिम : मालेगाव २३.

यवतमाळ : बाभुळगाव ३३, दारव्हा २७, दिग्रस ३३, महागाव २२, नेर ३३, यवतमाळ २९.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर.

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडलेली ठिकाणे :

वसई १०५ (जि. पालघर), इगतपुरी १२० (जि. नाशिक), लोणावळा कृषी १३९ (जि. पुणे), महाबळेश्वर १०१ (जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com