Rain Prediction Agrowon
हवामान

Rain Forecast : दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

Weather Forecast Maharashtra : राज्यात मॉन्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्यात मॉन्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. १४) दक्षिण कोकण, पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, उर्वरित विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग सर्वसाधारण स्थितीत आहे. राजस्थानच्या जैसलमेर, दिल्ली, लखनौ, मिर्झापूर, बालुरघाट ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत सक्रिय आहे.

पूर्व मध्य आणि नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ४.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर, तर दक्षिण उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेशातील चक्राकार वाऱ्यांपासून दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यात पाऊस जोर धरण्यास पोषक हवामान होत आहे. तळ कोकण, घाटमाथ्यावर पाऊस सुरू असून, विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत आहे. उर्वरित राज्यातही ढगाळ हवामानासह पावसाच्या सरी पडत आहे.

आज (ता. १४) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT