Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : तापमानातील चढ-उतार कायम राहणार

Latest Weather News : ऑक्टोबर हीटचा चटका वाढल्यानंतर राज्यात पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे.

अमोल कुटे

Pune News : ऑक्टोबर हीटचा चटका वाढल्यानंतर राज्यात पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले आहे. आज (ता. २१) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनने देशाच्या निरोप घेतला असून, दक्षिण भारतात दोन दिवसात ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यात ढगाळ हवामान असून, कमाल तापमान कमी अधिक होत आहे. शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

सोलापूर, सांताक्रूझ, जळगाव येथे तापमान ३६ अंशांच्या पुढे होते. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. १) राज्यात ढगाळ आणि मुख्यतः कोरड्या हवामानसह, उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुक्रवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.१, जळगाव ३६.०, कोल्हापूर ३३.२, महाबळेश्वर २६.०, नाशिक ३३.६, सांगली ३३.६, सातारा ३३.१, सोलापूर ३६.२, सांताक्रूझ ३६.१, डहाणू ३४.०, रत्नागिरी ३४.२, छत्रपती संभाजीनगर ३३.४, नांदेड ३४.२, परभणी ३४.०, अकोला ३६.४, अमरावती ३५.०, बुलडाणा ३३.७, ब्रह्मपूरी ३५.८, चंद्रपूर ३३.०, गडचिरोली ३२.८, गोंदिया ३३.२, नागपूर ३३.२, वर्धा ३३.९, वाशीम ३५.२, यवतमाळ ३४.०.

दोन्ही समुद्रात कमी दाब क्षेत्र

अरबी समुद्रामधील कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाले असून, ही प्रणाली पश्चिमेकडे सकरत आहे. आज (ता. २१) अरबी समुद्रातील प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. यातच आग्नेय बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

अकोला ३६.४, सोलापूर ३६.२, सांताक्रूझ ३६.१, जळगाव ३६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT