Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Weather Forecast : कमाल, किमान तापमानात चढ-उतार शक्य

Maharashtra Weather Report : आज (ता. २) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Rain Update : राज्याच्या कमाल आणि कमान तापमानाच चढ-उतार सुरू आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा जाणवत आहे. तर दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतिक्षा आहे. आज (ता. २) राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा चटका वाढल्यानंतर अखेरच्या टप्प्यात कमाल तापमानात घट झाली. काही भागात किमान तापमान कमी झाल्याने थंडीची चाहूल लागली. बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील सांताक्रूझ येथे ३६.३ तर डहाणू येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३१ ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम असला तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतिक्षा आहे. बुधवारी (ता. १) जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. निफाड, छत्रपती संभाजीनगर, पुणे वगळता उर्वरित राज्यात तापमानाचा पारा १५ अंशांच्या वरच आहे.

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.२ (१४.९), जळगाव ३३.२ (११.०), कोल्हापूर ३१.३ (१९.६), महाबळेश्वर २६.१ (१५.९), नाशिक ३१.९ (१५.४), निफाड ३२.२ (१३.८), सांगली ३२.४ (१९.३), सातारा ३२.५ (१६.६), सोलापूर ३५.४ (१७.६), सांताक्रूझ ३६.३ (२२.५), डहाणू ३६.० (२१.६), रत्नागिरी ३५.९ (२३.०), छत्रपती संभाजीनगर ३२.६ (१४.४), नांदेड - (१८.२), परभणी - (१५.९), अकोला ३३.६ (१८.१), अमरावती ३२.२ (१८.३), बुलढाणा ३२.० (१७.४), ब्रह्मपूरी ३४.७ (२०.०), चंद्रपूर ३०.८(१८.०), गडचिरोली ३२.२ (१६.४), गोंदिया ३१.६ (१७.४), नागपूर ३१.५ (१८.४), वर्धा ३१.५(१८.४), वाशीम ३२.६(१६.४) यवतमाळ ३२.२ (१५.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT