Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार शक्य

Summer Season : राज्यातील ढगाळ हवामान निवळताच उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यातील ढगाळ हवामान निवळताच उन्हाचा चटका आणि उकाडा चांगलाच वाढला आहे. तर किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज (ता. २०) किमान मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट होण्याचा तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडी निवळली असून, बिहारच्या मोतीहारी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतात विजांसह पाऊस, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने झळा आणि उकाडा तापदायक ठरत आहे. सोमवारी (ता. १९) अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या, तर काही ठिकाणी ३६ अंशांच्या वर गेले आहे.

उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत निफाड, धुळे येथे तापमान पुन्हा ११ अंशांच्या जवळपास आले आहे. आज (ता. २०) उन्हाचा चटका, उकाडा कायम राहणार असला तरी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.१ (१४.७), धुळे ३५.५ (११.५), जळगाव ३६.२ (१५.३), कोल्हापूर ३४.६ (१९.७), महाबळेश्वर २९.५ (१६.१), मालेगाव ३६.२ (१७.२), नाशिक ३४.३ (१४.०), निफाड ३२.० (१०.६), सांगली ३५.६ (१९.२), सातारा ३४.६ (१५.८), सोलापूर (२०.५), सांताक्रूझ ३४.३ (१९.५), डहाणू ३२.१ (१७.९), रत्नागिरी ३२.१ (१९.९),

छत्रपती संभाजीनगर ३४.२ (१९.२), नांदेड ३५.८ (१९.८), परभणी ३६.५ (१८.७), अकोला ३६.८ (१९.१), अमरावती ३४.६ (२०.५), बुलडाणा ३४.५ (१९.०), ब्रह्मपुरी ३५.२ (१८.६), चंद्रपूर ३४.४ (१८.६), गडचिरोली ३२.६ (१७.०), गोंदिया ३२.८ (१८.१), नागपूर ३४.५(१९.०), वर्धा ३५.०(१९.६), वाशीम ३३.६ (१७.०), यवतमाळ ३६.२ (१९.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT