Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : किमान तापमानात चढ-उतार शक्य

Latest Weather Forecast : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. अवकाळी पावसाचे ढग दूर होताच किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडी ओसरली असून, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर यथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कर्नाटक किनारपट्टी ते उत्तर महाराष्ट्रापर्यंतचा हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. त्यामुळे राज्यातील आकाश निरभ्र होत आहे.

राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. रविवारी (ता. १८) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंशांच्या वर गेले आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. १९) उन्हाचा चटका, उकाडा कायम राहणार असून, तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३५.३ (१५.५), नगर ३४.० (-), धुळे ३५.० (१५.४), जळगाव ३६.७ (१७.७), कोल्हापूर ३४.७ (१९.२), महाबळेश्वर २९.२ (१७.५), मालेगाव ३६.८ (१६.६), नाशिक ३३.२ (१५.७), निफाड ३२.५ (१३.८), सांगली ३५.१ (१७.२), सातारा ३४.५ (१५.९), सोलापूर ३७.४ (१८.५), सांताक्रूझ ३३.८ (२१.१), डहाणू ३१.६ (१९.४), रत्नागिरी ३६.३ (१९.५),

छत्रपती संभाजीनगर ३३.८ (१७.६), नांदेड ३४.२ (२०.८), परभणी ३५.१ (१९.०), अकोला ३५.४ (२०.२), अमरावती ३३.८ (२०.३), बुलढाणा ३४.४ (१८.८), ब्रह्मपूरी ३५.७ (१९.६), चंद्रपूर ३४.० (१८.०), गडचिरोली ३२.० (१६.८), गोंदिया ३२.० (१६.८), नागपूर ३३.६(२०.६), वर्धा ३४.५(१८.६), वाशीम ३३.६ (१७.४), यवतमाळ ३६.० (१८.७).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Disease: उन्हाळ्यात टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांसाठी ३ सोपे उपाय

Sugarcane GPS Survey: उत्तर प्रदेशात ऊस पिकाचे जीपीएस सर्वेक्षण, शेतकऱ्यांना 'एसएमएस'द्वारे माहिती, अनेक फायदे मिळणार

Crop Insurance Delay: पीक विमा तत्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा

World Veterinary Day: पशुवैद्यकीय सेवांमुळेच पशुधन सुरक्षित

Farmer Protest: आंबा, काजू उत्पादकांचा १५ मे रोजी ‘वर्षा’वर मोर्चा

SCROLL FOR NEXT