Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : कमाल तापमानात चढ-उतार शक्य

Summer Heat : राज्याच्या कमाल तापमानात थोडीशी घट झाली आहे. मात्र उन्हाची ताप आणि उकाडा टिकून आहे.

Team Agrowon

Weather Update Pune : राज्याच्या कमाल तापमानात थोडीशी घट झाली आहे. मात्र उन्हाची ताप आणि उकाडा टिकून आहे. वाढलेल्या चटक्याने विदर्भ पोळला असून, उर्वरित राज्यातही झळा कायम आहेत. आज (ता. २७) राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असून, कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, गोंदिया, अकोला, नागपूर येथे कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे.

कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे. उन्हाचा चटका आणि दमट हवामानामुळे उकाड्यातील वाढ कायम आहे.

दक्षिण हरियाणापासून सिक्कीमपर्यंत पूर्व-पश्चिम, तसेच मध्य प्रदेशपासून, विदर्भ, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत दक्षिणेत्तर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत. आज (ता. २७) उष्ण व दमट हवामानामुळे राज्यात चटका आणि उकाडा कायम राहणार आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.२ (२४.४), जळगाव ४१.२ (२६.३), धुळे ४०.६ (२२.२), कोल्हापूर ३४.२ (२३.९), महाबळेश्वर ३०.६ (१८.५), नाशिक ३६.३ (२३.८),

निफाड ३७.६ (२५.६), सांगली - (२३.८), सातारा ३५.८ (२३.७), सोलापूर ३९.२ (२४.४), सांताक्रूझ ३३.९ (२६.८), डहाणू ३५.३ (२९.०), रत्नागिरी ३४.४ (२६.५),

छत्रपती संभाजीनगर ३९.४ (२१.६), नांदेड ४१.२ (२७.४), परभणी ४०.५ (२६.५), अकोला ४२.० (२६.८), अमरावती ४१.६(२५.४), बुलढाणा ३९.२ (२४.६), ब्रह्मपूरी ४१.४ (२७.०),

चंद्रपूर ४३.२(२६.०), गोंदिया ४२.१ (२६.०), नागपूर ४२.० (२६.२), वर्धा ४२.५(२८.२), वाशीम ४०.२(२५.४) यवतमाळ ३९.७ (२५.५).

मॉन्सूनची चाल मंदच

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १९) दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर हजेरी लावली. त्यानंतर तब्बल आठवडाभरापासून मॉन्सूनच्या वाटचालीत बदल झालेला नाही. शुक्रवारी (ता. २६) मॉन्सूनची स्थिती जैसे थे आहे. दोन ते तीन दिवसात दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्राच्या आणखी काही भागासह अंदमान बेटांच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hailstorm Crop Damage: मराठवाड्यात गारपिटीचा साडेअकरा हजार हेक्टरवर फटका

Farmer Dignity: शेतकऱ्याला सन्मान मिळेपर्यंत आमचा लढा: राजू शेट्टी

Grape Crop Damage: द्राक्ष बागांच्या नुकसानीची मंत्री शेलार यांच्याकडून पाहणी

Book Review: राजकीय अर्थव्यवस्थेतील बदलांचा आरसा

Global Energy Crisis: ऊर्जा स्वावलंबनाचे आव्हान...

SCROLL FOR NEXT