Monsoon Update  Agrowon
हवामान

Monsoon Update : उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून परतण्यासाठी पोषक वातावरण

Latest Weather Update : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू असून, मंगळवारी मॉन्सूनने (ता. ३) संपूर्ण राजस्थानसह गुजरातच्या काही भागातून माघार घेतली आहे.

Team Agrowon

Monsoon News : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) परतीची वाटचाल सुरू असून, मंगळवारी मॉन्सूनने (ता. ३) संपूर्ण राजस्थानसह गुजरातच्या काही भागातून माघार घेतली आहे. गुरुवारी (ता. ५) मॉन्सूनची परतीची वाटचाल कायम असून, दोन दिवसांत महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून वारे परतण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ६) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वरील प्रणालीपासून पूर्व उत्तर प्रदेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाने उघडीप दिली असून, निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येऊन उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. परभणी पाठोपाठ अकोला, चंद्रपूर येथे तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. आज (ता. ६) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह कोरड्या व उष्ण हवामानाचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.२, जळगाव ३३.८, कोल्हापूर ३०.९, महाबळेश्वर २४.१, नाशिक ३२.९, सांगली ३३.४, सातारा ३२.५, सोलापूर ३४.७, सांताक्रूझ ३२.०, डहाणू ३३.०, रत्नागिरी ३०.५, छत्रपती संभाजीनगर ३२.८, परभणी ३५.८, अकोला ३५.२, अमरावती ३४.२, बुलडाणा ३२.६, ब्रह्मपुरी ३४.७, चंद्रपूर ३५.०, गडचिरोली ३३.६, गोंदिया ३२.६, नागपूर ३४.७, वर्धा ३४.५, वाशीम ३२.४, यवतमाळ ३४.०.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT