Weather Update  Agrowon
हवामान

Weather Forecast : विदर्भ, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान

Rain Update : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. २५) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

अमोल कुटे

Pune News : जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. दिवसा उन्हाचा चटका कायम असून सायंकाळनंतर गारठा वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून (ता. २५) विदर्भासह मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २३) हरियाणातील कर्नाल येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उत्तर भारतात १४५ नॉट्स वेगाने जोरदार वारे वाहत असून, महाराष्ट्रातही जोरदार वारे वाहत आहेत.

दक्षिण तेलंगणा आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उद्यापासून (ता. २५) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या खाली आला असला तरी उन्हाच्या झळा कायम आहे. शुक्रवारी (ता. २३) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. २४) कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (११.७), नगर ३४.३ (१२.६), धुळे ३२.० (११.६), जळगाव ३१.२ (१३.९), कोल्हापूर ३३.६ (१६.४), महाबळेश्वर २६.८ (१३.०), मालेगाव ३४.० (१४.६), नाशिक २९.१ (१३.०), निफाड ३१.२ (८.८), सांगली ३४.२ (१७.३), सातारा ३२.८ (१३.२), सोलापूर ३५.८ (१८.०), सांताक्रूझ ३०.० (१९.५), डहाणू २९.६ (१८.५), रत्नागिरी ३०.५ (१७.६),

छत्रपती संभाजीनगर ३२.० (१६.०), नांदेड ३२.८ (१६.८), परभणी ३३.६ (१७.१), अकोला ३३.१ (१६.२), अमरावती ३१.४ (१७.५), बुलढाणा २९.६ (१७.०), ब्रह्मपूरी - (१६.२), चंद्रपूर ३५.० (१६.२), गडचिरोली ३४.२ (१६.०), गोंदिया ३१.४ (१६.२), नागपूर ३३.२(१७.०), वर्धा ३३.०(१६.७), वाशीम ३५.६ (१४.६), यवतमाळ ३४.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

Fisheries Crisis : तलाव आटल्याने मत्स्य संस्थांवर आर्थिक संकट

SCROLL FOR NEXT