Rain Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाला पोषक हवामान

Maharashtra Weather Update : हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, पावसासाठी पोषक प्रणालींच्या अभावामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसाची दडी कायम आहे.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Update : हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असलेला मॉन्सूनचा आस, पावसासाठी पोषक प्रणालींच्या अभावामुळे राज्याच्या अनेक भागांत पावसाची दडी कायम आहे.

राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत असून, आज (ता. १४) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या उत्तरेकडे कायम असून, चार-ते पाच दिवसांत हा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीत येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस गोरखपूर, दरभंगा, मालदा ते नागालँडपर्यंत सक्रिय आहे.

सिक्कीमपासून वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्राकार वाऱ्यात झाले आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

मॉन्सून कमजोर असला तरी तुरळक ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावत आहेत. राज्याच्या अनेक भागांत मुख्यतः पावसाची उघडीप आहे.

ढगाळ हवामानामुळे उकाडाही जाणवत आहे. आज (ता. १४) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT