Agriculture Weather
Agriculture Weather  Agrowon
हवामान

Weekly Weather : अति उष्ण हवामान; अल्प पावसाची शक्यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज, उद्या व मंगळवारी (ता. १४, १५ व १६) हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. मात्र बुधवारी (ता.१७) हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यानंतर गुरुवारी (ता. १८) १००६ हेप्टापास्कल, शुक्रवारी (ता. १९) महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल व दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल, तसेच शनिवारी (ता. २०) ही हवेचे दाब तितकेच कमी राहतील. जेव्हा तापमानात वाढ होते, तेव्हाच हवेचे दाब कमी होतात. त्यामुळे हा आठवडा अति उष्ण राहील.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होऊन ते ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. तसेच किमान तापमानातही वाढ होऊन ते बहुतांशी जिल्ह्यात २७ ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे. कोकण व उत्तर महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. मराठवाड्यात वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून, पश्‍चिम विदर्भात वायव्य व ईशान्येकडून तर मध्य व पूर्व विदर्भात आग्नेयेकडून राहील.

पेरूजवळ प्रशांत महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. मात्र हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. ढगनिर्मिती होऊन मॉन्सूनपूर्व पाऊस यापुढील काळतही होण्याची शक्यता निर्माण होईल.

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यांत किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ७२ ते ७७ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ८० ते ८१ टक्के, तर पालघर जिल्ह्यात ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता पालघर जिल्ह्यात ४३ टक्के, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व रायगड जिल्ह्यांत ३१ ते ३३ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. ठाणे जिल्ह्यात अल्पशा पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र

कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ६४ ते ६८ टक्के, तर जळगाव व धुळे जिल्ह्यांत ४४ ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा

धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ४१ ते ४९ टक्के राहील. लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५५ टक्के, तर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. धाराशिव जिल्ह्यात ६ मि.मी., लातूर जिल्ह्यात ४४ मि.मी., बीड जिल्ह्यात १० मि.मी. व नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १ ते ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम विदर्भ

कमाल तापमान बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ

कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १.५ ते २.५ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

पूर्व विदर्भ

भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत २ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र

कमाल तापमान सातारा व पुणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, सातारा व पुणे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. सांगली, सोलापूर व नगर जिल्ह्यांत किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ५६ ते ५७ टक्के, तर सांगली, सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ४३ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे १८ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्य, ईशान्ये, आग्नेय व वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला

खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून पूर्वमशागतीची कामे सुरू करावीत.

केळी बागेचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती हिरवी शेडनेट लावावी.

फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करावा.

आंबा फळांची काढणी सकाळी सहा ते नऊ किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करावी.

जनावरांच्या गोठ्यात फॉगर्स यंत्रणा कार्यान्वित करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा भावावरील दबाव कायम; कापूस, सोयाबीन, तूर तसेच कांदा यांचे बाजारभाव काय आहेत ?

Sugar Production : साखर उत्पादन वाढले पाच लाख टनांनी, उतारा मात्र घटला

Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

Soybean Seed Processing : सोयाबीन बीज प्रक्रियेवर जोर

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

SCROLL FOR NEXT