Cyclone Michaung Agrowon
हवामान

Cyclone Michaung : ‘मिगजौम’ चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याला धडकले

Cyclone Michaung Latest Update : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ तीव्र चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारी किनाऱ्याला धडकले.

अमोल कुटे

Pune News : बंगालच्या उपसागरातील ‘मिगजौम’ तीव्र चक्रीवादळ मंगळवारी (ता. ५) दुपारी किनाऱ्याला धडकले. ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह ही वादळी प्रणाली बपतला जवळ जमिनीवर आली.

जमिनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होऊ लागली असून, पूर्व किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान झाले असून, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. ३) पहाटेपासून ‘मिगजौम’ चक्रीवादळ घोंघावू लागले आहे. सोमवारी (ता. ४) चक्रीवादळ आणखी तीव्र झाल्यानंतर मंगळवारी (ता. ५) दुपारी १२.३० वाजता या वादळाने जमिनीवर प्रवेश करायला सुरुवात केली.

चक्रीवादळाचे केंद्र ओंगोलेपासून २० किलोमीटर पूर्वेकडे, बपतला पासून ४५ किलोमीटर, मच्छलीपट्टणमपासून १०० किलोमीटर नैॡत्य दिशेला, तर नेल्लोरपासून १२० किलोमीटर उत्तरेकडे होते.

चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, तमिळनाडूतील पूनामेल्ली (जि. तिरुवेल्लूर) येथे ३४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तमिळनाडूसह, आंध्र प्रदेश, रायलसीमामध्ये अनेक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

समुद्र खवळल्याने किनाऱ्यालगत उंची लाटा उसळू लागल्या असून, सखल भागात पाणी साचले आहे. या वादळामुळे कच्ची, पक्की घरे, रस्ते, भात पिके, फळ पिके यांचे नुकसान होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT