sandeep Shirguppe
मागच्या २४ तासांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मिचाँग' या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.
आज (ता. ५) दुपारी हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशातील नेल्लोर ते मच्छलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागच्या २४ तासांत चक्रीवादळ चेन्नईपासून ९० कि.मी. तर नेल्लोरपासून १७० कि.मी. मच्छलीपट्टणमपासून ३२० कि.मी.आणि पुदुच्चेरीपासून २०० कि.मीवर होते.
आज (ता.५) दुपारी ते नेल्लोर व मच्छलीपट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ओडिसावरही या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम होणार असून येथील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिचाँग चक्रीवादळ येत्या २४ तासांत धडकण्याची (लँडफॉल) शक्यता असल्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश हाय अलर्टवर आहेत.
तामिळनाडूला पावसाचा तडाखा बसेल, तर आंध्र प्रदेशात कहर होईल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.
मिचौंग चक्रीवादळामुळे मागच्या २४ तासांत चेन्नईत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, चैन्नईसह अनेक शहरे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली.
चेन्नई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, हजारो लोकांना ४०० विवाह हॉल विस्थापित कुटुंबांना राहण्यासाठी तयार केले गेले आहेत.
चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांमध्ये हवामान लक्षात घेता सरकारने सोमवार आणि मंगळवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.