Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून सरींनी थंडावा

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या सरींनी थंडावा आणला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.

अमोल कुटे

Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या सरींनी थंडावा आणला आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्व मोसमी पावसाच्या ढगांची छाया कायम आहे. आज (ता. ७) राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर गुजरात मध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, मध्य प्रदेशापासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मॉन्सून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात दाखल झाला असतानाच, उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाने तडखा दिला आहे. ढगाळ हवामान, पावसाच्या हजेरीने राज्याच्या कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. गुरूवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चाकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्याच्या कमाल तापमानात घट होऊन, ढगाळ हवामान व उकाडा कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरूवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) :

कोकण : लांजा, माणगाव, वैभववाडी प्रत्येकी २०, मालवण, खेड, देवरूख, उरण, गुहागर प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : पुणे (एनडीए) ६०, धुळे, खेड प्रत्येकी ५०, जत, नेवासा, पंढरपूर, जेऊर, दौंड, गगनवावडा प्रत्येकी ३०, नांदगाव, चांदवड, वाळवा प्रत्येकी २०, सावळी विहीर, शाहूवाडी, कडेगाव, जामखेड, भोर, भडगाव, फलटण, पुणे शहर, शिरूर, बारामती, पलूस, वेल्हे प्रत्येकी १०.

मराठवाडा : औसा, नांदेड, उदगीर प्रत्येकी ३०, उमरगा, शिरूर अनंतपाळ, देगलूर, मुखेड प्रत्येकी २०, शिरूर कासार, वाशी, परळी वैजनाथ, पालम, सोयगाव, निलंगा, वैजापूर, प्रत्येकी १०.

विदर्भ : मलकापूर २०, चिखलदरा, अकोट, बुलडाणा प्रत्येकी १०.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : मंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT