Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Andaj : राज्यात थंडी वाढणार; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात मोठी घट 

Maharashtra Weather Update : राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट झाली. त्यामुळे राज्यात थंडी जाणवत आहे. दुपारी काही भागात उन्हाचा चटकाही जाणवत आहे. राज्यातील किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी वाढण्याचा अंदाज आहे. 

पावसाळी वातावरण निवळताच उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येऊ लागले आहे. परिणामी राज्यात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यात थंडी वाढू लागली असून, किमान तापमान ११ अशांपर्यंत घसरले आहे.

आजपासून राज्याच्या तापमानात २ ते ४ अंशांची घट होणार असल्याने राज्यातील गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कोमोरिन भाग आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस सुरू असून, उत्तर भारतात आकाश निरभ्र होत थंडी वाढू लागली आहे. दिल्लीत सध्या देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. 

कोकण आणि राज्याचा दक्षिण भाग वगळता उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अलिबाग येथे ३६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT