Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : राज्यात गारठा वाढणार; पुढील पाच  दिवसांचा हवामान अंदाज काय?

Maharashtra Weather Forecast : पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

Dhananjay Sanap

Pune News : राज्यात थंडीनं जोर धरला आहे. किमान तापमनात घट झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात गारठा वाढला आहे. पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. 

राज्यात रब्बी हंगामातील विविध शेती कामांना वेग आला आहे. नाचणी भात पिकाची काढणी, तर कापूस वेचणी सुरू ठेवावी. गहू पेरणी सोबतच पूर्व हंगामी ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी सुरू ठेवावी.

तर करडई, हरभरा पिकात उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून घ्यावी, तसेच तूर पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल गरजेनुससार पाणी द्यावं. तर हरभरा, ज्वारी पिकासोबत भाजीपाला पिकाला हलके पाणी द्यावे, असा असा सल्ला राज्यातील विविध प्रादेशिक कृषी हवामान केंद्रांनी दिला आहे. 

अरबी समुद्रातील कोमोरिन आणि लगतच्या भागात समुद्रसपाटीपासून ०.९ किमी ऊंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर केरळपासून दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील वाऱ्याची स्थिती समुद्र सपाटीपासून ०.९ किमी वर आहे. देशाच्या उत्तर भागात किमान तापमनात काहीशी घट नोंदवली गेली आहे. तर देशात बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमान १ ते २ अंश सेल्सियसनं घसरले आहेत.

मागील २४ तासात देशात रिज येथे नीचांकी ८.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात जेऊर येथे नीचांकी ११ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. राज्यात पुढील पाच दिवस कोरड्या हवामानसह गारठा वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT