Weather Update : खानदेशात तापमानात काहीशी घट

Temperature Update : खानदेशात कमाल तापमानाने अनेक भागांत सत्तेचाळीस अंशांचा टप्पा पार केला होता. परंतु शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) कमाल तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली.
Weather Summer Update
Weather Summer Updateagrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात कमाल तापमानाने अनेक भागांत सत्तेचाळीस अंशांचा टप्पा पार केला होता. परंतु शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) कमाल तापमानात चार ते पाच अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. तर सोमवारीदेखील (ता. २७) कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने केळीसह अन्य पिकांची मोठी हानी खानदेशात झाली. किमान ४० हजार हेक्टरवरील केळीबागा होरपळल्या. तसेच वेलवर्गीय पिकांचेही नुकसान झाले. तापमानात सतत वाढ झाली. एप्रिलमध्ये १२ पेक्षा अधिक दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअस होते. या महिन्यात मात्र कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. भुसावळ, जळगाव, चोपडा, यावल भागात कमाल तापमान तीनपेक्षा अधिक दिवस ४७ अंश सेल्सिअस होते. तर अनेक दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत होते.

Weather Summer Update
Monsoon Rain : माॅन्सून उद्यापर्यंत केरळात येणार; माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान; राज्यात पावसाचा अंदाज

उष्णतेमुळे शेतीकामांना फटका बसला. शेतीकामे सकाळी सहा ते सकाळी नऊ या कालावधीच उरकण्याचा प्रयत्न शेतकरी करीत होते. सायंकाळी सहापर्यंत सूर्य आग ओकत होता. परंतु मागील तीन दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपुढे गेलेले नाही. रविवारी ४१ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान होते.

तर सोमवारी त्यात काहीशी वाढ होऊन कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. परंतु वाऱ्याचा वेग कायम आहे. वारा वेगात वाहत असून, दुपारी मात्र उष्ण झळा असतात. रात्रीच्या उष्ण झळा मागील दोन दिवस कमी राहील्या आहेत. लहान केळीबागा तापमानामुळे होरपळल्या असून, कोट्यवधींची केळी पिकाची हानी झाली आहे. सर्वच पिकांची उत्पादकता खालावली आहे.

Weather Summer Update
Monsoon Update : अरबी समुद्रातून मॉन्सूनची वाटचाल सुरू

तापमानात घटीमुळे पूर्वमशागतीस वेग येत आहे. रविवारी ढगाळ वातावरण , कमी तापमान असल्याने दुपारीदेखील अनेक शेतकऱ्यांनी आपापली कामे उरकली. शेतात ट्रॅक्टरने मशागत, खते पसरविणे, बांध स्वच्छतेची कामेही सुरू होती. तापमान पुढेही कमी राहील्यास शेतीकामे गती घेतील. काही शेतकऱ्यांनी अतिउष्णतेमुळे कापूस लागवड टाळली होती किंवा कमी क्षेत्रात केली होती. आता पुढे या लागवडीसही वेग येईल.

वाऱ्याने अडचणी

तापमान कमी झाले आहे. परंतु वाऱ्याचा वेग अधिक आहे. सुसाट वारा सकाळी, दुपारी असतो. रात्रीही अशीच स्थिती असते. यामुळे शेतशिवारात रोहित्रांची वीज बंद असते. फ्युज नादूरुस्त होतात. ते सुरू करून पुन्हा वीज सुरू करावी लागते. ग्रामीण भागात तारांचा स्पर्श होऊन बिघाड होत आहेत. यामुळे ग्रामस्थ, शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com