Maharashtra Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम

Maharashtra Weather Forecast : उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १३ अंशांपर्यंत खाली आल्याने गारठा वाढला आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १३ अंशांपर्यंत खाली आल्याने गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. रविवारी (ता. १०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

नैॡत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती मुळे या भागात मंगळवारपर्यंत (ता. १२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत. वरील प्रणालीपासून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

कोकणात उन्हाचा चटका कायम असला तरी उर्वरित राज्यात कमाल तापमानात घट होत आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मध्य महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारठा वाढत आहे. राज्यात कमाल-किमान तापमानातील तफावत कायम आहे. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात घट होत असली तरी थंडीची प्रतीक्षा आहे.

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे होते. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, निफाडसह नाशिक, जळगाव येथे तापमान १५ अंश व त्यापेक्षा कमी झाले आहे. तर महाबळेश्‍वर, अहिल्यानगर, महाबळेश्वर, पुणे येथे किमान तापमान १६ अंशांच्या खाली आहे. आज (ता. ११) उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल आणि किमान तापमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.६ (१६.४), अहिल्यानगर २९.८ (१५.५), धुळे १३ (१३.०), जळगाव ३४ (१५), कोल्हापूर ३१.३ (१९.६), महाबळेश्‍वर २६.५ (१५.४), मालेगाव ३०.२ (१७), नाशिक ३१.४ (१४.२), निफाड ३१.५ (१३.१), सांगली ३१.४ (१८.८), सातारा ३२.३ (१६.१), सोलापूर ३४.६ (२२.२), सांताक्रूझ ३५.६ (२२.२), डहाणू ३४.५ (२०.०), रत्नागिरी ३५.९ (२१.८), छत्रपती संभाजीनगर ३१.९ (१५), नांदेड (१७.३), धाराशिव ३१.९ (१९), परभणी ३१.७ (१७.२), अकोला ३३.३ (२०.८), अमरावती ३१.६ (१९.२), बुलडाणा ३०.६ (१८.४), ब्रह्मपुरी ३३.६ (१७.९), चंद्रपूर ३२.८ (१७.४), गडचिरोली ३२ (१७.६), गोंदिया ३१.८ (१९.८), नागपूर ३१.६ (२०.४), वर्धा ३१.२ (२०), वाशीम ३४.६, यवतमाळ ३१.४ (१७.२).

१६ अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे

धुळे १३, निफाड १३.१, नाशिक १४.२, जळगाव १५.०, महाबळेश्वर १५.४, अहिल्यानगर १५.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

Mahabeej Golden Jubilee: ‘महाबीज’चा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

SCROLL FOR NEXT