Weather Update  Agrowon
हवामान

Weather Update : ढगाळ हवामान, उन्हाची तीव्रता कायम राहणार

Weather News : विदर्भात गुरुवारी (ता. १५) सायंकाळी तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : विदर्भात गुरुवारी (ता. १५) सायंकाळी तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान, उन्हाची ताप आणि उकाडा कायम आहे. आज (ता. १७) राज्यात तापमानातील वाढ, उन्हाचा चटका राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ढगाळ हवामान होत असतानाच उन्हाचा चटका, उकाडा कायम आहे. गुरुवारी (ता. १५) सायंकाळनंतर अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात वादळी पाऊस झाला. सातपुडा पर्वत रांगांतील काही भागांत गारपीट झाली.

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान ३३ अंशांवरच आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे.

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.२ (१६.५), नगर ३३.२ (१८.३), धुळे ३१.५ (१२.५), जळगाव ३२.३ (१५), कोल्हापूर ३४.१ (१९.१), महाबळेश्वर २८.८ (१६.८), मालेगाव ३२.८ (-), नाशिक ३२.१ (१८.५), निफाड ३१.२ (१४.४), सांगली ३४.८ (१९.५), सातारा - (१७.५), सोलापूर ३७ (२०.८), सांताक्रूझ ३२.९ (२१.१), डहाणू २९.१ (२०.४), रत्नागिरी ३४.६ (२०.३),

छत्रपती संभाजीनगर ३२.५ (१९.१), नांदेड - (२१.८), परभणी ३३.६ (१९.४), अकोला ३३.८ (२०), अमरावती ३१.८ (१८), बुलडाणा ३२.५ (१७.२), ब्रह्मपुरी ३४.८ (१९.९), चंद्रपूर ३३.२ (१६.८), गडचिरोली ३२.२ (१६), गोंदिया ३०.९ (१७.६), नागपूर ३०.४(१८.६), वर्धा ३१.९(१९.२), वाशीम ३३.२ (१६.६), यवतमाळ ३३ (१८).

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान

उत्तर भारतात थंडी कमी झाली आहे. पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. दक्षिण गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहे. पश्चिम विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी : जयकुमार गोरे

Solar Energy Projects: सांगलीत मागणीच्या ४० टक्के विजेची जिल्ह्यामध्येच निर्मिती

Healthy Village Campaign: ‘माझं गाव- आरोग्य संपन्न गाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Chinese Illegal Raisin: चीनच्या बेकायदा बेदाण्यामुळे शेतकरी संतप्त

Cotton Cultivation: कापूस लागवडीकडे कल, ‘एचटीबीटी’ शिरकावाची धास्ती

SCROLL FOR NEXT