Weekly Weather : बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Weather Update : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आकाश बहुतांशी भागांत पूर्णतः ढगाळ राहील. आज व उद्या (ता.११, १२) राज्यातील बऱ्याच भागांत पावसाची शक्यता निर्माण होईल. पावसाचा जोर मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ व पश्‍चिम विदर्भात अधिक राहील.
Rainy Weather
Rainy Weather Agrowon

Agriculture Weather : महाराष्ट्रावर या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात गुरुवार (ता.१५) पर्यंत १०१४ हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब राहतील. शुक्रवार (ता. १६) हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतका कमी होईल. त्यामुळे कमाल व किमान तापमान निश्‍चितच वाढ होईल. हवेचे दाबही कमी होतील. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच आकाश बहुतांशी भागांत पूर्णतः ढगाळ राहील.

आज व उद्या (ता.११, १२) राज्यातील बऱ्याच भागांत पावसाची शक्यता निर्माण होईल. पावसाचा जोर मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ व पश्‍चिम विदर्भात अधिक राहील. मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अल्पसे राहील. तसेच कोकण व उत्तर महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. मात्र पावसाची शक्यता नाही.

जळगाव जिल्ह्यात अत्यल्प पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून असलेल्या जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता निर्माण होईल. ज्या जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील, तेथे पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यांत हवामान थंड व कोरडे राहील.

सध्या बऱ्याच विषुववृत्तीय भागांत प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान घसरले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान २५, २६ ते २८ अंश सेल्सिअस, तर क्वचितच ठिकाणी ३० अंश सेल्सिअस आहे. याउलट हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस, अरबी समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस आहे.

तर बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस असल्यामुळे सध्या आग्नेय दिशेने वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणत आहेत. त्यामुळे या उन्हाळी हंगामात पूर्वमोसमी पावसाची शक्यता निर्माण होईल.

Rainy Weather
Maharashtra Rain : विदर्भात तीन दिवस पावसाचा अंदाज; राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज

कोकण

कमाल तापमान सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, रायगड व ठाणे जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ४७ टक्के, रायगड जिल्ह्यात ३५ टक्के व ठाणे जिल्ह्यात २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३० टक्के, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २० ते २९ टक्के आणि ठाणे व पालघर जिल्ह्यांत १५ ते १७ टक्के इतकी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० किमी आणि दिशा वायव्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज व उद्या (ता.११, १२) जळगाव जिल्ह्यात अत्यल्प म्हणजे ०.१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २६ ते ३३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते २१ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

मराठवाडा

आज व उद्या (ता.११, १२) धाराशिव जिल्ह्यात १.४ ते २.२ मि.मी., लातूर जिल्ह्यात १.७ ते ०.२ मिमी, नांदेड जिल्ह्यात ८.८ मि.मी. व ०.९ मि.मी., बीड जिल्ह्यात ०.९ ते १.२ मि.मी., परभणी जिल्ह्यात ३.१ मि.मी. व १.६ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात ९.४ मि.मी. व १.३ मि.मी., जालना जिल्ह्यात १.८ ते ०.२ मि.मी., तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ०.३ ते ०.४ मि.मी. पावसाची शक्यता राहील.

कमाल तापमान परभणी व धाराशिव जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यांत किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, तर परभणी जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ५७ ते ६७ टक्के, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ४४ ते ४७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते २२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ८ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

Rainy Weather
Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा

पश्चिम विदर्भ

बुलडाणा जिल्ह्यात आज (ता. ११) ४ मि.मी. व उद्या (ता. १२) ०.५ मि.मी., अकोला जिल्ह्यात आज (ता. ११) ९.१ मि.मी. व उद्या (ता.१२) २.५ मि.मी., वाशीम जिल्ह्यात आज (ता. ११) ३.८ मि.मी. व उद्या (ता. १२) ४ मि.मी., तर अमरावती जिल्ह्यात १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यात आज (ता. ११) ४६ मि.मी. व उद्या (ता. १२) ९.८ मि.मी., वर्धा जिल्ह्यात आज (ता. ११) ४३ मि.मी. व उद्या (ता. १२) १५ मि.मी., तसेच नागपूर जिल्ह्यात आज (ता. ११) २६ मि.मी. व उद्या (ता. १२) २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७८ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर जिल्ह्यात आज (ता. ११) २२ मि.मी. व उद्या (ता. १२) ३.४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. ११) ११ मि.मी. व उद्या (ता. १२) ३.९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात आज (ता. ११) २२ मि.मी. व उद्या (ता. १२) ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे,. तर गोंदिया जिल्ह्यात आज (ता. ११) १२ मि.मी. व उद्या (ता. १२) १० मि.मी. पावसाची शक्यता आहे.

कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ४३ ते ४७ टक्के आणि गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ३२ ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते ११ कि.मी. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज व उद्या (ता.११,१२) कोल्हापूर जिल्ह्यात ०.३ मि.मी., सांगली जिल्ह्यात ०.२ मि.मी., सातारा जिल्ह्यात ०.६ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात १.१ ते ०.६ मि.मी., पुणे जिल्ह्यात ०.१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. कमाल तापमान कोल्हापूर, सातारा व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान नगर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर सातारा जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६६ टक्के, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ४० ते ४६ टक्के राहील.

पुणे व नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ३७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते २० टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

कृषी सल्ला

ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेला शेतीमाल योग्य निवाऱ्याखाली ठेवावा.

उन्हाळी हंगामातील भुईमूग, बाजरी, तीळ या पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.

जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची लागवड करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com