Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Hawaman Andaj : उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका वाढला

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागात गारठा पुन्हा वाढू लागला. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यातील बहुतांशी भागात गारठा पुन्हा वाढू लागला. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे.

आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील सर्वात कमी ४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आणखी थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. आज हरियानातील हिस्सार आणि राजस्थानमधील चुरू येथे ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

तर राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात देशातील सर्वात कमी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान चालू हंगामातील सर्वात निच्चांकी ठरले आहे. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे ८.७ अंश सेल्सिअस आणि नंदूरबार येथे ९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

विषुववृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र आणखी ठळक झाले आहे. आज हे ठळक कमी दाब क्षेत्र नैऋत्य बंगालच्या उपसागरात होते. ही प्रणाली तमिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT