Monsoon Rain Agrowon
हवामान

Monsoon Rain: पाऊस उसंत घेण्याची शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज

Rain Update : बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. तर हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाची विश्रांती राहील, असा अंदाज दिला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील काही भागात आज पावसाने हजेरी लावली. तर अनेक भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होते. बहुतांशी भागात पावसाची उघडीप कायम होती. तर हवामान विभागाने उद्यापासून राज्यात पावसाची विश्रांती राहील, असा अंदाज दिला. 

हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. पण उद्यापासून राज्याच्या अनेक भागात पाऊस उसंत घेण्याची शक्यता आहे.

उद्या विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मराठवडा, मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि खानदेशात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवारी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर तेसच रायगड आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे.

पण मराठवाडा आणि खानदेशात तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. शनिवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT